शिवसेनाप्रमखांच्या स्मारकाची अंतिम सुनावणी २ मार्चला

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबई महापौरांच्या बंगल्यातील स्मारकाला विरोध करणान्या जनहित याचिकेची न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठाने २ मार्चला अंतिम सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहेशिवाजी पार्क येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचे काम करण्यासाठी राज्य सरकारने २७ सप्टेंबर,२०१६ रोजी एका आदेशाद्वारे बोर्ड स्थापन केले होतेत्याआधी ४ डिसेंबर,२०१४ रोजी स्मारक उभारण्याबाबत उच्चस्तरीय समिती बनविण्यात आली. या समितीच्या वेळोवेळी बैठका झाल्या. या समितीने स्मारक उभारण्यासाठी महापौर बंगल्याची जागा निवडण्याचा निर्णय घेतला होता. नगरविकास खात्याने २६ जानेवारी, २०१६ रोजी मुंबई महापालिका आयुक्तांना आदेश देऊन महापौर बंगल्याची जागा हस्तांतर करण्याचे आदेश दिले. त्या विरोधात मानव जोशी आणि जनहित मंचचे अध्यक्ष भागवानजीरयानी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्या आहेत.त्या याचिकांवर आज न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.यावेळी याचिकाकर्तयांच्या वतीने आरक्षण उठविण्याच्या निर्णयाला जोरदार आक्षेप घेतला. न्यायालयाने याची दखल घेत याचिका २ मार्चला अंतिम आर्थिक संकटात सुनावणीला घेण्याचा निर्णय घेऊन सुनावणी तहकूब ठेवली. हेरिटेजप्रवर्गात असलेल्या महापौर बंगल्याच्या वास्तूत गेल्या पाच दशकांहून अधिक काळापासून मुंबईचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांचे शासकीय निवासस्थान आहे. त्यामुळे वास्तूत बाळासाहेबां च्या स्मारकाला जागा देणे योग्य . नाही, असा दावा भगवानजीरयानी . ___ यांनी याचिकेत केला आहे.