भिवंडीतील नारपोली पोलीस व अन्न प्रशासन विभागाने अडीच कोटीचा गटवा केला जप्त


नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांना दापोडा येथील सिद्धिनाथ कॉम्प्लेक्स मधील बी ८५ या गोदामात बेकायदा गुटखा साठविला असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक विष्ण आव्हाड व पोलीस उपनिरीक्षक आर.जे. वरकटे यांच्या पथकाने छापा घातला.यानंतर अन्न प्रशासन विभाग ठाणे या कार्यालयाशी संपर्क साधून कारवाईसाठी पाचारण केले. अन्न व औषध प्रशासनाचे पथक घटनास्थळी आले व त्यांनी कारवाई सुरू केली. अन्ननिरीक्षक शंकर राठोड यांना या गोदाम संकुलात दोन ट्रक संशयास्पद उभे असलेले आढळले. त्यांची तपासणाकला असता या ट्रकमध्यहा गुटखा सापडला.या कारवाईत दोन कोटी५३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून मोहम्मद इमरान नुरु दीन खान, गोदाममालक अमित गोसरणी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोदाम व्यवस्थापक विशाल मांडवकर, नागेंद्रकुमार यादव यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, १६ जानेवारी रोजी तालुक्यातील खारबाव येथे दोन कोटी७५लाख रुपयांचा गुटखा जप्त केला होता.