| मोटरखुमन मनीषा म्हस्के यांचा भाजपाने केला सत्कार

बदलापूरः बदलापुरातील कात्रप भागात राहणाऱ्या मनीषा म्हस्के वातानुकूलित लोकलचे सारथ्य करणाऱ्या पहिल्या महिला मोटरमन ठरल्या आहेत. त्यामुळे बदलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदचे पाणीपुरवठा समिती सभापती संभाजी शिंदे यांनी त्यांची भेट घेऊन भाजपाच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले.कुळगाव बदलापूर नगर परिषदेतील भाजपा गटनेते राजेंद्र घोरपडे, पाणीपुरवठा समिती सभापती व माजी शहराध्यक्ष संभाजी शिंदे, नगरसेवक प्रशांत कुलकर्णी, किरण बावसकर आदींनी मनीषा म्हस्के यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मध्य रेल्वेच्या पहिल्या वातानुकूलित लोकलचे गुरुवारी ३० जानेवारी रोजी पनवेल ते ठाणे या ट्रान्सफर मार्गावर उद्घाटन करण्यात आले. या लोकलचे सारथ्य केले ते बदलापूरच्या मोटारवूमन मनीषा मस्के यांनी. अत्यंत सामान्य कुटुंबातून उत्तुंग भरारी घेणारा आणि उल्हासनगरमध्ये माहेर असणाऱ्या मनीषा मस्के या मह य रेल्वेच्या ट्रान्सहार्बर मार्गावर लोकोपायलटची ड्यूटी बजावतात. त्यांच्या समावेशानंतर मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हिजन मध्ये एकूण तीन महिलांचा लोकोपायलट म्हणून समावेश झाला आहे. आपले इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी लोकोपायलटच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला. पुरुषी समजल्या जाणाऱ्या या नोकरीमध्ये आपला वेगळा ठसा उमटवण्यात मनीषा मस्के यांना यश आले आहे. __ आता सेवानिवृत्ती व्यक्तींना हयातीचा दाखला