ओपीडी बंद असल्याने रुग्णांचे हाल

- __ कल्याण:करोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला असून खासगी रुग्णालयेदेखील रुग्णांच्या सेवेसाठी सुरू ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मात्र आधीच आरोग्य सेवेचे तीन तेरा वाजलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. सर्दी, ताप, खोकला यांसारख्या आजाराची लक्षणे दिसणारे रुग्ण भीतीने गर्भगळीत होत रुग्णालयात धाव घेत असताना पालिकेच्या कल्याण पूर्वेकडील गीता हरकिसनदास रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) गुरुवारी बंद ठेवण्यात आल्याचे फलक लावत बंद करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.